थोडक्यात परिचय

मी पैलवान श्री काळुराम आनंदा नढे, काळेवाडी प्रभाग क्रमांक २२ मधून, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये उच्चशिक्षित व विकासाभिमुख उमेदवार म्हणून आपल्या सर्व सुज्ञ मतदारांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मूनही, आई-वडिलांच्या संस्कारातून समाजसेवेची शिकवण घेऊन आजवरचा सामाजिक प्रवास अखंडपणे सुरू ठेवला आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना फक्त कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकांच्या विश्वासावर उभे असलेले हे माझे नेतृत्व आहे.

सामाजिक सेवेला ३०+ वर्षे समर्पित प्रवास

आझाद मित्र मंडळ स्पोर्ट्स क्लब (स्थापना – १९८७) माध्यमातून गेली अनेक वर्षे काळेवाडी व परिसरात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा मान मला मिळाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत रस्ते, पाणी, प्रकाशयोजना, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा आणि शैक्षणिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे.

उच्चशिक्षित, अनुभवी, आणि आंतरराष्ट्रीय दृष्टी असलेले नेतृत्व

मी स्वतः उच्चशिक्षित पदवीधर असून, शालेय व महाविद्यालयीन काळात कुस्ती सारख्या खेळात पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळालेला आहे.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर गेली २७ वर्षे हिंजवडी आयटी पार्कमध्ये सेवेत कार्यरत असून सध्या मॅनेजर पदावर कार्यरत आहे. कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावत असताना, अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

कामाच्या निमित्ताने मला इटली, स्लोवाकिया (युरोप) आणि अमेरिका येथे काम करण्याची संधी मिळाली. परदेशात पाहिलेल्या प्रगत कल्पना आणि उच्च दर्जाची स्वच्छता, शिस्त, क्रीडा व आरोग्य व्यवस्था आपल्या प्रभागात राबवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.

शिक्षण आणि क्रीडा—माझा जीवनधर्म

  • १८ वर्षांपासून काळेवाडीतील मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

  • दरवर्षी दोन विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण दत्तक

  • आमदार लक्ष्मणभाऊ जगताप वार्षिक क्रीडा शिष्यवृत्ती – कुस्तीपटूला ‘वर्ष दत्तक’ घेऊन प्रोत्साहन (४ वर्षे)

जिल्हा नियोजन समिती – लोकांच्या प्रश्नांसाठी थेट काम

लोकनेते स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून कार्य करताना:

  • सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आणि पर्यावरणाशी निगडित अनेक प्रश्नांवर सकारात्मक काम

  • जिल्ह्यातील अनेक विकासकामे मंजूर करून पूर्णत्वास

  • आमदार अश्विनीताई जगताप व आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग व शहराच्या उन्नतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न

सामाजिक उपक्रम — लोकांसाठी, जनतेसाठी

  • आरोग्य शिबिरे

  • रक्तदान शिबिरे

  • पर्यावरण पूरक उपक्रम

  • शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम

  • क्रीडा स्पर्धा

हे सर्व केवळ दाखवण्यासाठी नाही—तर लोकांच्या हितासाठी केलेले प्रत्यक्ष काम आहे.

का हवा तुमच्यातलाच एक लोकप्रतिनिधी?

कारण तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास, आणि मला तुमच्यातून मिळालेली ताकद मी आजवर कधीच वाया जाऊ दिली नाही. मी एक सर्वसामान्य घरातून आलेला, मेहनतीने पुढे आलेला, तुमच्यातलाच एक माणूस आहे.

विश्वास ठेवा…
आपण सर्व मिळून, संकल्प आणि सिद्धीच्या बळावर, काळेवाडी प्रभागाचा विकास आणखी वेगाने पुढे नेऊ.

एक पाऊल तुमचे –
एक निर्धार माझा –
आणि दिशा विकासाची
!

एकदा काम पहा आणि मग ठरवा की तुमचं मत कोणाला.

Mr. Pahalwan Kaluram Ananda Nadhe engaging warmly with local residents during a community meeting in Kalewadi.
Mr. Pahalwan Kaluram Ananda Nadhe engaging warmly with local residents during a community meeting in Kalewadi.

Gallery

Moments from the heart of Kalewadi’s community work

Mr. Nadhe participating in a cleanliness drive alongside volunteers in Prabhag No. 22.
Mr. Nadhe participating in a cleanliness drive alongside volunteers in Prabhag No. 22.
A candid shot of Mr. Nadhe listening attentively to a group of local elders sharing their concerns.
A candid shot of Mr. Nadhe listening attentively to a group of local elders sharing their concerns.