ध्येय व उद्दिष्टे

काळेवाडीचा खऱ्या अर्थाने चेहरा-मोहरा बदलण्याचा काम खऱ्याअर्थात पुढे येणाऱ्या भविष्य काळात करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. Focused on real change in Kalewadi.

मुलांसाठी चांगले शिक्षण

माहिती: शाळांमध्ये लागणाऱ्या सुविधा वाढवून मुलांचे शिक्षण अधिक चांगले बनवू.

स्वच्छ पिण्याचे पाणी प्रत्येक घरापर्यंत

माहिती: कोणाच्याही घरी पाणीटंचाई होऊ देणार नाही, शुद्ध पाणी वेळेवर मिळेल याची काळजी घेऊ.

आपल्या परिसरात उत्तम आरोग्य सेवा

माहिती: गरजेच्या वेळी लगेच डॉक्टर आणि उपचार मिळावेत यासाठी सुविधा वाढवू.

युवकांसाठी कौशल्य विकास

माहिती: आपल्या भागातील मुला-मुलींना शिकून काम मिळावे यासाठी मोफत प्रशिक्षण देऊ.

स्वच्छ व पर्यावरण पूरक वातावरण

माहिती: कचरा व्यवस्थापन नीट ठेवून, जास्तीत जास्त झाडे लावून परिसर सुंदर करू.

चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते

माहिती: आपल्या सगळ्यांच्या रोजच्या वापराचे रस्ते नेहमी स्वच्छ, नीट आणि सुरक्षित ठेवू.

“लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही — रोजच्या जीवनातील गरजा पूर्ण करणे होय”.
आपल्या कालेवाडी प्रभागातील सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, पाणी-रस्ता, पर्यावरण यांसारख्या मूलभूत समस्या सोडवणं हे माझं प्राथमिक काम असेल.

मी रोज समाजकार्याने, युवकांना प्रेरित करून, आणि स्थानिक समस्या समजून काम करतोय. आता या संधीचा उपयोग करून, आपल्या विश्वासाचा प्रत्यय देऊन, आपल्या प्रभागाला पुढे घेऊन जाऊया.

आपण रोजच्या धावपळीत आपण सर्वजण असतो, मी सुद्धा स्वतः 8 तास कंपनीत कामाला जाऊन काम करतोय हे सगळ्यांना दिसत नाही, पण आम्ही काळेवाडीत रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि युवकांच्या रोजगारासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न व काम करत आलो आहोत. आमचं उद्दिष्ट एकच — सामान्य माणसाचं आयुष्य सोपं, सुरक्षित आणि थोडं तरी चांगलं करणं. तुमच्या एका विश्वासानं आम्ही हा बदल आणखी वेगाने पुढे नेऊ.

मी मोठ्या वचनांच्या मागे नाही, पण जे जमेल ते प्रामाणिकपणे करतो. तुमच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणी — पाणी उशिरा येणं, रस्ता खराब असणं, प्राथमिक काही सुविधा नसणं, कचरा वेळेवर न जाणं — या गोष्टी सोडवण्याचा काम मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मी स्वतः सामान्य कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे “लोकांना खरं कोणत्या गोष्टींची गरज आहे” हे मला समजतं. मी कोणाला मोठी आश्वासनं देत नाही, पण तुम्हाला गरज पडली की मी तुमच्या पाठीशी उभा राहीन, हे वचन तुम्हाला मी देतो