आमचे कार्य
विकास साधला, ते ही नगरसेवक पद नसताना.
पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य असून फक्त ग्रामीण भागात ॲक्सेस असताना आपल्या गावासाठी आपल्या प्रभागासाठी काहीतरी करायचे म्हणून आमदार शंकर शेठ जगताप व अश्विनीताई जगताप यांच्या विकास निधीच्या व मार्गदर्शनाच्या माध्यमातून काळेवाडीतील अनेक रस्त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करता आला.


































कोरोना / Covid19
कोरोना महामारीच्या कठीण काळात आम्ही जनतेसाठी अखंड सेवाभावाने काम केले. गरजूंना अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर वाटप, सोशल डिस्टन्सिंग तसेच रुग्णांना रुग्णालयात बेड व औषधांची मदत उपलब्ध करून दिली. लोकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आम्ही प्रत्येक प्रभागात तत्पर सेवा दिली आणि समाजाची साथ कायम ठेवली.



पत्रव्यवहार
नागरिकांकडून येणारे अर्ज, तक्रारी, सूचना आणि सामाजिक पत्रव्यवहार वेळेत व आदराने हाताळणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून त्यावर योग्य ती नोंद घेऊन संबंधित विभागांपर्यंत माहिती पोहोचवली जाते. पारदर्शक संवादामुळे समस्यांचे निराकरण जलद होते आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो.









































प्रभाग क्रमांक.22 (पत्रव्यवहार 2025)
प्रभाग क्रमांक.22 (पत्रव्यवहार 2023-24)

PMRDA / पुणे जिल्हा नियोजन समिती






















































भुयारी मार्ग
काळेवाडीच्या डीमार्टच्या समोर असणारा हा नाना धर्माधिकारी भुयारी मार्ग काळेवाडीच्या वाहतुकीच्या व नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या अशा भुयारी मार्गाची अवस्था सुलभ शौचालया सारखी 2022-23 या वर्षांमध्ये झाली होती. त्यासाठी अत्यंत आंदोलनात्मक परिस्थिती निर्माण करून प्रशासनाकडून त्याच्या सुरक्षा रक्षकाचे, स्वच्छतेचे व सीसीटीव्ही व सुशोभीकरणाचे काम करून घेतले.
ड्रेनेज लाईन काम
नागरिकांच्या आरोग्यासाठी सुलभ व सुरक्षित ड्रेनेज लाईन व्यवस्था उभारली आहे. जुन्या लाईन दुरुस्ती, नवीन पाइप टाकणे व सांडपाणी योग्य मार्गाने वाहून जाण्यासाठी दर्जेदार काम पूर्ण केले आहे. काळेवाडीतील पुणेरी स्वीट व नाथकृपा डेअरी परिसरात अनेक दिवसांपासून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाला तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनांनंतर ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये दर्जेदार काम पूर्ण झाले. यामुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना दिलासा मिळाला.












पुणे जिल्हा नियोजन समिती कार्य
माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे PMRDA अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेडोपाडी विकास कामांना चालना मिळाली. रस्ते दुरुस्ती, शाळा सुधारणा, परिसर सुशोभीकरण अशी अनेक उपयुक्त कामे प्रामाणिकपणे पूर्ण करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
















रक्तदान व आरोग्य शिबिरे
नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी नियमित रक्तदान शिबिरे व मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये रक्त तपासणी, रक्तदाब, साखर व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देऊन समाजसेवेचा उपक्रम राबवला जातो.
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त सहकाऱ्यांच्या सहभागातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही परंपरा आजही समाजसेवेच्या भावनेने सुरू आहे.
॥दानात श्रेष्ठ दान रक्तदान॥













वृक्षारोपण
आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले आहे. रस्त्याच्या दुतर्फा, शाळा परिसर व मोकळ्या जागांवर झाडे लावून परिसर हिरवागार व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.































झाड लावणे सोपे, पण त्यांचा संवर्धन करणं सोपी गोष्ट नाही
आम्ही फक्त झाडे लावून थांबत नाही, तर प्रत्येक झाडाची काळजीही घेतो. जिथे जिथे झाडे लावली, तिथे नियमित पाणी देणे, देखभाल करणे आणि ती निरोगी वाढावीत यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातात. प्रत्येक झाड आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. वृक्षारोपणासोबत संवर्धन करून हिरवे व सुंदर पर्यावरण घडवणे हा आमचा खरा उद्देश आहे.

काळेवाडीतील अन्यायकारक आरक्षण रद्द करण्याच्या लढ्यात नागरिकांसोबत ठाम उभा!
इंदू लॉन्स, काळेवाडी येथे झालेल्या बैठकीत आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांनी आरक्षण क्र. 4/39 (गार्डन) व 4/44 (खेळाचे मैदान) मुळे बाधित नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. सुमारे 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गरीब व सर्वसामान्य नागरिकांची घरे बाधित होणार असल्याने हे आरक्षण रद्द करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या संदर्भात मी पाठपुरावा केला, सर्व बाबी नीट समजून घेऊन नागरिकांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले. आरक्षण रद्द होईपर्यंत पूर्णपणे नागरिकांसोबत उभे राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.







काळेवाडीतील अन्यायकारक आरक्षण रद्द होणार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 14 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या नव्या विकास आराखड्यात काळेवाडी प्रभाग क्र.22 मधील मोठ्या रहिवासी भागावर गार्डन (आर. क्र. 4/39) व खेळाचे मैदान (आर. क्र. 4/44) अशी आरक्षणे टाकण्यात आली होती, ज्यामुळे सुमारे 30 वर्षांपासून राहणाऱ्या अनेक गरीब व मध्यमवर्गीयांचे पक्के घरे बाधित होत होती.
या विषयावर आ. शंकरभाऊ जगताप यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन इंदू लॉन्स, काळेवाडी येथे बैठक घेतली, सविस्तर माहिती सादर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आरक्षण रद्द करण्याची ग्वाही आ. शंकरभाऊ जगताप यांनी दिली व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा शब्द दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला.

शिष्यवृत्ती
गेल्या १८ वर्षापासून मी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका ५६/१ व ५६/२ काळेवाडी या शाळेत माजी विद्यार्थी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण व समाजाचे ऋण व काहीतरी देणे लागतो या नात्याने त्यांनी दरवर्षी चार विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च व त्याला शिष्यवृत्ती ही दिली जाते.










ओपन बुक लायब्ररी लोकार्पण
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त काळेवाडी येथील कै. बंडू नढे प्राथमिक मनपा शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज “ओपन बुक लायब्ररी” चे लोकार्पण करण्यात आले.
या लायब्ररीचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानाचा प्रसार व्हावा व विचारांची समृद्धी घडावी.
आ. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप व श्री. शंकर पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
॥ भाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचा संकल्प ॥








धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळुराम नढे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यातील चिंचपूर, पांढरेवाडी, साखरेवाडी, लांडेवाडी व लोखंडेवाडी येथील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना ४५० जीवनावश्यक मदत किट्स (धान्य, किराणा, कपडे व ब्लँकेट) वाटप करण्यात आले.
शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजसेवेचे कार्य करत राहणे हे आमचे कर्तव्य मानून ही मदत करण्यात आली. या उपक्रमासाठी सर्व सहकाऱ्यांचे व ग्रामपंचायतीचे मनापासून आभार.







ऑपरेशन पवना रेस्क्यु – प्रशासनाचे मनापासून आभार (जुलै 2024)
जुलै 2024 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काळेवाडी प्रभाग क्र. 22 मधील नढेनगर परिसरातील अनेक वस्ती भाग पाण्याखाली गेले होते. गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने कारवाई करत 300 ते 350 नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
या मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीसाठी मोलाचे योगदान दिले. तसेच पिंपरी-चिंचवड मनपा आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशामक दल व वाकड पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे ही रेस्क्यू मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली.






पुरग्रस्त भागात स्वच्छता व निर्जंतुकीकरण
रेस्क्यू कारवाईनंतर केवळ मदतीपुरतेच न थांबता , पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत महानगरपालिका प्रशासनास तात्काळ मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच परिसरात संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या आरोग्याचे संरक्षण हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने सतत पाठपुरावा करून आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या.







Morya colony Road
गेल्या १८ वर्षापासून मी स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपाव त्याला शिष्यवृत्ती ही दिली जाते.
